Header Ads

पाऊस काई पडत नाय,त्तेनं काई अडत नाय.

प्रसन्नाची "पाऊस पडतच नाही" कवितेच्या शिर्षकावरून ही पावसाला उपरोधक विनोदी व-हाडी कविता सुचली. कितपत जुळली? ठाव नाय. अर्थातच हे आपण मला सांगणार आहात. होय की नाही???

काय ल्याहाव पावसाचं,
मले काई कयत नाय.
बोल्याचं त खुप काई,
पण मले काई जुयत नाय...

पाऊस काई पडत नाय,
त्तेन काई अडत नाय.

तु आली नाय, पाऊस बी.
काय आहे नातं तुय?
थो न राह्यत एका ठायी,
पन तुह्य मले कयत नाय...

पाऊस काई पडत नाय,
त्तेन काई अडत नाय.

परसातली तुयशी सुकली,
सुकडे सारे पानं भाय.
पण माह्या कायजाचं काई?
तुले काई जडत नाय....

पाऊस काई पडत नाय,
त्तेन काई अडत नाय.

सुकलं सारं नदीचं पाणी,
सारं जीवन रेती काय?
पावसाचा त विरह बाणा,
पन तुह्य काई वळत नाय....

पाऊस काई पडत नाय,
त्तेन काई अडत नाय.

पिरती झाली तार तार,
तुह्या साठी मराव काय?
पिंजारलं काईज माह्यं,
दे माय धरणीठाय...

पाऊस काई पडत नाय,
त्तेन काई अडत नाय.

ये तु ,पावसासकट.
हिरवी होईन धरणीमाय.
पावसातच गाऊ अन न्हाउ.
पाऊसच सारं सारं, काय...

पाऊस काई पडत नाय,
त्तेन काई अडत नाय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

बळीराजा

भिंतीच्या उलगडल्या रेघा;लई दिस झाले,नाही मारला चुना पावसाचं आड्यातुन गळते पाणी;लई दिस झाले,नाही फ़ेरलं आडं आंगणातली चुरमडली तुळसी;झडले सारे पानं शेतातलं पीक सारं;गेलं करपून

स्मृतीच्या माळरानावर

तुझ्या स्मृतीच्या माळरानावर,माझी स्मृती फ़ुलु देत एकदातरी प्राजक्तासारखी।उमलु दे माझ्या स्वप्नातील कळ्या,भुंग्याचे एक 'रूप' होऊन ।

सांगून ठेवतो

आकाशात चमकणा-या रम्य चंद्रा,आज ढ्गाआड लपू नकोस,सुगंध शिंपणा-या फ़ुलावरच ओलं दंव टिपू नकोस,माझी प्रिया येणार आहे ती आल्यावर...

आदर्श विवाह : आजची आवश्यकता

हिंदू संस्कृतीच्या सोळा संस्कारांपैकी विवाह सुध्दा एक मानव जीवनाचा संस्कार आहे. फ़ार जुन्या श्रीस्वेतकेतुच्या( सामाजिक कार्यकर्ता ज्याने विवाहाची पध्दती पहिल्यांदा सुरू केली. )पिढ्यानपिढ्या प्रचलित असलेल्या भारतीय संस्कृतीच्या धार्मिक अनुष्ठानाचा आणि कालान्तराने धर्म-विधीचे एक स्वरूप प्रकटलेल्या विवाहाबद्दलच्या पवित्र कल्पनाच आपण धुडकाऊन लावल्या आहेत.

प्रेमा तुझा रंग असा..

प्रिय...... प्रेमाचे दोन अश्रू. मी तुला सदर पत्र लिहीत आहे याच आश्चर्य वाटत असेल कदाचीत ! नाही? पण खरोखरच तुझ्या स्मृती आज वेदनेची ओल ...

Blogger द्वारे प्रायोजित.