Header Ads

बळीराजा

विदर्भात शेतक-यांच्या आत्महत्या होत्त आहेत. आत्महत्येला कारणीभूत ठरणारी त्याची एकंदर आर्थिक स्थिती,सावकारांचा तगादा व त्याच्या घरातील परिस्थिती विषद करणारी ही छोटीसी काव्य पुष्टी.

भिंतीच्या उलगडल्या रेघा
लई दिस झाले, नाही मारला चुना
पावसाचं आड्यातुन गळते पाणी
लई दिस झाले, नाही फ़ेरलं आडं

आंगणातली चुरमडली तुळसी
झडले सारे पानं
शेतातलं पीक सारं
गेलं करपून

सांजेचा दिवा जळते कहिभहि
फ़ोडणीलेच तेल आता सापडत नाही
मिरगाचे दिस आले शेतीत टाकाचा दाणा
पैशाले तं भहीन! सावकार चाले उताणा

कसे दिसं पाह्यले,आता येते लळू
बुढी बी राहून लळते मुळुमुळु
बळीराजाले पाहा कसे दिसं आले
मायबाप सरकार काय करते मंबईले?

राघोबा तं गेला,आता माही कां बा वाट?
बळीराजाचा कां आता ? असाच परिपाठ ?

२ टिप्पण्या

चैतन्य देशपांडे म्हणाले...

माय म्हने मले तुहा बाप गेला रानात,
तो वापस आला त तुले भाकर भेटन पानात.- सचीन पेठकर
-विदर्भातल्या काही संवेदनशील कवींच्या काही ओळी ही कवीता वाचून आठवल्या.

पयले किलोन काजू भेटे, लोकायले खायासाटी
आता किलोन लाकड भेट्टे, लोकायले जायासाटी
गरीबाच्या झोपडीत अजून उपाशीच निजते रात
अन तेलासाठी तडफडते, दिव्यामंदी वात - जनार्दन पाटिल.

Mridagandh म्हणाले...

खूप छान प्रतिक्रिया...

बळीराजा

भिंतीच्या उलगडल्या रेघा;लई दिस झाले,नाही मारला चुना पावसाचं आड्यातुन गळते पाणी;लई दिस झाले,नाही फ़ेरलं आडं आंगणातली चुरमडली तुळसी;झडले सारे पानं शेतातलं पीक सारं;गेलं करपून

स्मृतीच्या माळरानावर

तुझ्या स्मृतीच्या माळरानावर,माझी स्मृती फ़ुलु देत एकदातरी प्राजक्तासारखी।उमलु दे माझ्या स्वप्नातील कळ्या,भुंग्याचे एक 'रूप' होऊन ।

सांगून ठेवतो

आकाशात चमकणा-या रम्य चंद्रा,आज ढ्गाआड लपू नकोस,सुगंध शिंपणा-या फ़ुलावरच ओलं दंव टिपू नकोस,माझी प्रिया येणार आहे ती आल्यावर...

आदर्श विवाह : आजची आवश्यकता

हिंदू संस्कृतीच्या सोळा संस्कारांपैकी विवाह सुध्दा एक मानव जीवनाचा संस्कार आहे. फ़ार जुन्या श्रीस्वेतकेतुच्या( सामाजिक कार्यकर्ता ज्याने विवाहाची पध्दती पहिल्यांदा सुरू केली. )पिढ्यानपिढ्या प्रचलित असलेल्या भारतीय संस्कृतीच्या धार्मिक अनुष्ठानाचा आणि कालान्तराने धर्म-विधीचे एक स्वरूप प्रकटलेल्या विवाहाबद्दलच्या पवित्र कल्पनाच आपण धुडकाऊन लावल्या आहेत.

प्रेमा तुझा रंग असा..

प्रिय...... प्रेमाचे दोन अश्रू. मी तुला सदर पत्र लिहीत आहे याच आश्चर्य वाटत असेल कदाचीत ! नाही? पण खरोखरच तुझ्या स्मृती आज वेदनेची ओल ...

Blogger द्वारे प्रायोजित.